बुधवार, ३ ऑगस्ट, २०११

"पणती"

               "पणती" 

आसमंत सारा भगवा झालेला 
रविराज पहा अस्ताला चाललेला !
क्षितिजावर पसरली आहे सारी लाली 
कोण असेल माझ्यानंतर या जगाचा वाली ! 
 सूर्यदेवाला लागून राहिली मोठी  खंत 
अंधारातून वाचवण्यासाठी येईल का कोणी संत?
अस्त हळू हळू जवळ येत चालला 
लाल शेंदरी रंग काळा होऊ लागला !
आता मात्र जीवाला लागला मोठा घोर 
पण अंधारातून कोणी तरी आल समोर ! 
सूर्याला आशेचा किरण थोडा दिसला 
पण अंधाराला भेदण्यासाठी कोण पुढे आला ?
 हळू  हळू पावलं टाकत पुढे 'ती ' आली 
 सूर्य देवाला नमस्कार करत म्हणाली !
"देवा तुमच्या एवढी नाही माझी शक्ती
पण तुम्हावर माझी आहे मोठी भक्ती !
अंधार सारा दुनियेचा नाही होणार दूर 
पण माझ्या आसपास उजेड देईन भरपूर " ! 
हे ऐकताच सूर्याचा भरून आला उर !
जगातील अंधार नाही संपला सगळा 
पण 'पणतीने' आशेचा किरण दिला वेगळा  !
 सूर्यदेव मग निश्चिंत झाला 
पणतीला उद्धेशून म्हणाला 
"संकटकाळी धाऊन तू आली 
मोठी आहेस हिम्मत्वाली 
आशीर्वाद तुला देतो मी सगळा 
पण माणू नकोस मला तुझ्यापासून वेगळा
देवाच्या पुढची जागा तुला देतो 
इवलुश्या पणतीला सलाम करतो".
     
                                बिपीन जगताप 

-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा