मायेची माणस सोडताना
डोळ्यांच्या कडा पाणवतात
आठवणी पुन्हा दाटून येतात !
कित्येक दिवस घालवलेले
एकमेकांच्या संगतीने
कित्येक रात्री गेलेल्या
मनातल्या गुज गोष्टीने !
ते दिवस आता येणार नाहीत पुन्हा
मनाचा हळवा कोपरा राहील आता सुना
मुठीत साठवलेल्या वाळूसारखी
माणस अशी सुटून जातात
घट्ट पकडण्याच्या नादात
माणस अशी निघून जातात !
कोणत असं नात असत
मनाला हुरहुर लावत
कोणता हे प्रेम असत
डोळ्यांना ओलं करत !
निरोपाच्या वेळी डोळे सारे काही बोलतात
मनातल्या भावना डोळ्यातून सांडतात !
-- बिपीन जगताप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा