असे म्हणतात "माणूस जन्माला येतानाही एकटाच आणि जातानाही"...! पण जन्माला आल्यानंतर अनेक नाती आपल्याला चिकटू लागतात. आई एक असे नाते जे ममतेचे आणि वास्तल्याचे आहे जे जन्मापूर्वीच आपल्याशी एकरूप झाले आहे. त्याबरोबरच वडील, भाऊ, बहिण अशी नाती एकत्र येतात. आपण हि मग त्या नात्याचे एक भाग बनून जातो. आणि या सगळ्यातून साकारते कुटुंब...! मग आई वडिलांची नाती आपली होतात आणि त्या नात्यातून आपल्याला आजी, आजोबा, मामा, मावशी, आत्या , काका अशी मायेची नाती मिळतात जी जन्मभर पुरतात. आपण नात्यांनी समृद्ध होतो पण आज कुटुंब आणि नाती तुटत आहेत. घरातील अनुभवाचे वटवृक्ष आपण बाजूला टाकायला बघतोय. वृद्ध अश्रमासारखे पोरकी घरे निर्माण होऊ लागलेत.
घरात अनेक सुखसोई निर्माण झाल्या पण आधाराला मायेची माणस नसली तर पाठीवर हात ठेवत "गप्प रडू नकस...मी हाय ना..! असे म्हणणारे आश्वासक हात कोठून आणणार असे हात बाजारात विकत मिळ्णार नाही. घरोघरी मातीच्या चुली या म्हणी प्रमाणे अनेकांना वाटत असेल घरातील वृद्ध लोक गप्प बसत नाहीत आम्ही केलेलं कोणताही काम त्यांना आवडत नाही त्यामुळे त्यांच्यात आणि आमच्यात सतत भांडणे होतात त्यापेक्षा मग वेगळे राहिलेले बर ...पण यावर मला असे वाटते आई वडिलांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले आहेत. मोठ्या प्रमाणात पैसे आताच त्यांना दिसत असतील.. आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बापाल पोराचे पैशाची उधळपट्टी बघवत नाही ..आपल्या दृष्टीने ती उधळपट्टी नसते पण त्यांना तशी वाटत असते. अशा अनेक बाबीतून सहज भांडणे होतात आणि मग घरे फुटतात..! यासाठी आपणच समजदार होऊ या आणि घरातील नाती टिकवू या ..!
पुढच्या पिढीवर चांगले संस्कार घडवायचे असतील तर
आपल्या आईं वडिलांना आपल्या जवळ ठेवून आपल्या मुलाचे आजी आजोबा हे नाते टिकवावे लागेल. त्यामुळे कुटुंबात आणि समाजात अनेक नाती तयार होतील जी फक्त रक्ताची नाही तर मायेची असतील. जी तुम्हा आम्हाला प्रेम करायला शिकवतील .....या साऱ्या जगावर ....आणि जगातल्या साऱ्या माणसांवर !
--- बिपीन जगताप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा