शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

मन अथांग सागर



मन अथांग सागर 
क्षितिजा पर्यंत पोहचलेल 
मन मायेच्या ममतेने 
काठोकाठ भरलेलं

   मन जंगलाची निरव शांतता 
   साधुत्व निर्माण करणार 
   मन खळ खळनारा झरा 
   नाद करून वाहणार 

  मन वाऱ्याची गार झुळूक 
  हवीहवीशी वाटणारी 
  मन सूर्याची कोवळी किरण 
 थंडीत उबदार करणारी 

 मन पानावरील टपोरे दवबिंदू 
 हिऱ्यासारखे भासणारे 
 मन उन्हातील मृगजळ 
 तहनेलेल्या हरिणांना भुलवणारे


मन असं कसं  कुठही पळणार 
मन असं कसं सहज खुलणार  
मन ईश्वराची वेगळीच कल्पना 
मनाचं कोड कुणालाच उलगडणा 

---  बिपीन जगताप 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा