स्वप्नाच्या गावा जाताना
मन कस हरखून जात !
वास्तवाच दुखः थोडावेळ
मन कस हरवून जात !
स्वप्न मनाला लांब घेऊन जातात
परत माघारी घरी आणून सोडतात
स्वप्न म्हणजे मनाचा खरा सोबती
नवी आशा देणारा मनाचा राबती !
स्वप्नाची दुनिया खूप बरी वाटते
थोडावेळ का होईना पण खरी वाटते
स्वप्न पाहण्यासाठी दूर दृष्टी लागते
पूर्ण करण्यासाठी मग सृष्टीही कमी पडते !
स्वप्नांच्या या बाजारात
स्वप्न विकणारे दलालही असतात
स्वप्नाच्या दुनियेत राहणारी
मग सहज भुलून मरून जातात !
मनातले स्वप्न नक्की पूर्ण होईल
भविष्याला आपुल्या हाती देईल
खूप मोठी माणस स्वप्न बघतात
साकार करण्यासाठी जीवही देतात !
वास्तवाचे भान ठेऊन
मगच ते पूर्ण होईल
मनाला समाधान देऊन !
-- बिपीन जगताप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा