
मनसोक्त होऊन धरणीला भिजवाव
ढगांनी आपल सर्वस्य देऊन
धरणीला मातेला तृप्त करावं !
मातीच्या ओल्या सुगंधाने
मन कस भारावून जावं
वातावरण एवढ सुगंधी व्हाव
कि मातीतीलच एक होऊन जावं !
भिजलेली घरे ..रस्ते, झाडे वेली
मग मनमोहक भासतात
आकाशातून टपकणाऱ्या गारा
मग हिरे माणक होऊन जातात !
झाडांची पान..अन पक्ष्यांची लगबग
पावसाच्या पाण्याने शांत झाली तगमग
पाऊस धारा अश्या अचानक येतात
अन मनाला पार वेड करून जातात !
झरे खळ खळतात
नद्या भरून वाहू लागतात
गढूळ पाण्याचे मग
डोहाच डोह दिसू लागतात !
पावसाला ही आनंद होतो
निसर्ग सारा खुलून जातो
प्राणी पक्षी फुले वेली
सारे सारे भिजून गेली !
-- बिपीन जगताप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा