हे सुंदर अथांग आकाश
हा सूर्याचा कोवळा प्रकाश
त्या डोंगराच्या लांब रांगा
ईश्वर दुसरा कुठे आहे सांगा ?
इंद्रधनुचा रंग गेला आभाळा वरी
पानावरी पांढरे शुभ्र थेंबाचे पाणी
चमकू लागले कसे हिरयावानी
मला हा सारा ईश्वर दिसतो
डोळ्यांना माझ्या शांत करतो
घाम गाळत गाणे गाणारे
देव न मानता देवपण जगणारे
जिवंत माणसांना मदत करणारे
भुकेलेल्या ना दोन घास देणारे
आहेत हे सारेच ईश्वराचे अंश
पुढे घेऊन जातात माणुसकीचे वंश
बाळाचे ते लडिवाळ हसणे
हसत हसत ते सहज रुसणे
कोपऱ्यात जाऊन लपून बसणे
ह्रदयात हळूच घुसून जाणे
आनंदाचा डोह भरून आला उरी
ईश्वर सांगा अजून कोणत्या घरी !
-- बिपीन जगताप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा