माणुसकीची नाती जपतो आम्ही
मानवतेला धर्म मानतो आम्ही
जात धर्म पंथ भेद तोडतो आम्ही
माणसातच देव जाणतो आम्ही !
निसर्गाची नियमांना मानतो आम्ही
माणसाला माणसाशी जोडतो आम्ही
भाषा भेद, रंग भेद जाळतो आम्ही
माणसांच्या भावना जपतो आम्ही !
माणसांच्या ह्रदयात घुसतो आम्ही
ह्रदयाच्या जखमा भरतो आम्ही
शोषण अन्याय गाडतो आम्ही
माणसाला माणूसपण देतो आम्ही !
हे अथांग आकाश घेतो आम्ही
सागराची भव्य माया देतो आम्ही
प्रेमाचा वाहणारा झरा होतो आम्ही
माणुसकीची नाती जोडतो आम्ही !
- बिपीन जगताप
छान.
उत्तर द्याहटवामनःपूर्वक शुभेच्छा.