शनिवार, २९ ऑक्टोबर, २०११

कोवळी फुले


















कोवळी फुले गळून जातात
देठाला सोडून पडतात
अन्नावाचून तडफडतात
पाण्यावाचून आक्रंदतात
आणि रोज उशिरा रात्री
मोठ्या पार्ट्या डी जे वर नाचतात
पंचतारांकित हॉटेल बाहेर
खरकटे ढीग येऊन पडतात !
एक बाजू प्रकाशाची
दिवस रात्र बहरलेली
एक मात्र कायम काळोख्या
अंधाराला चिकटलेली
प्रकाशाच्या जगात माणस
मोठी होत असतात
अंधारात कित्येक जीव
शरीराचे सापळे सोडतात
मग टिपूस येत नाही डोळ्याला
फक्त कोरडा उमाळा येतो ह्रदयाला
एका बाजूला सुरु असतो जल्लोष
आनंदाचा मस्तीचा, जीरवल्याचा
आणि अंधारात सुरु होतो खेळ
भुकेल्या पोटांचा...शिकारी जीवाचा
अंधार असतो जीवघेणा पण
आग असते चालवणारी दूर जाऊन
परत अंधारात सोडणारी
कधीतरी प्रचंड उर्जेने एकदा अंधारात यावे
दूर झालेल्या लेकराला मिठीमध्ये घ्यावे
भावनांचा निचरा होण्यासाठी हमसून हुमसून रडावे !

-- बिपीन जगता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा