ब्रह्मांड विचारांच्या कक्षेत बसत नाही. विश्वाला नियमात बांधून ठेवत येत नाही . आकाशात पसरलेले अगणित तारे, ग्रह, यांचे मोजमाप करता येत नाही. सूर्याची आग आणि चंद्राची शीतलता कमी करता येणार नाही. सजीव सुर्ष्टीचा अभ्यास करणाऱ्यांना आजही मरण समजले नाही. या सगळ्या सजीव सुर्ष्टीत माणूस तसा सर्व सजीवांप्रमाणे एक जीव आहे. आपल्या बुद्धी कौशल्यावर काही अभ्यास करून या विश्वाची काही गूढ रहस्य त्यामागील ज्ञान शोधण्याचा खटाटोप माणूस नेहमी करत आला आहे. त्यातून काही विचारांनी काही प्रमाणे एकके शोधून काढली. काही निसर्गाच्या शक्तींचा शोध त्याने लावला आहे. त्यातूनच मग सूर्याला दिवस रात्रीत मोजणे सुरु झाले अमवस्या पौर्णिमेचा पंधरवडा सुरु झाला. पण हे सगळे फक्त मोजकाम आहे. हजारो वर्षापासून आपण मोजण्याचे काम केले आहे. त्यातून ठोस असे अजूनही काही मिळत नाही. माणूस जन्माला कि त्याच्या वयाचे मोजमाप सुरु होते. पण सतत वाहणारा वारा, कोसळणारा झरा, यांना मोजता येत नाही. निसर्गाला आपल्या कवेत घेता येणार नाही. निसर्गाच्या प्रकोपाला रोखण्याची ताकद अजूनही माणसात निर्माण झाली नाही.
माणूस हा निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. निसर्गाच्या अनेक रहस्यापैकी माणूस एक रहस्य आहे. माणसाला इतर प्राण्यांच्या तुलनेत कमी शारीरिक ताकद जरी दिली असली तरी त्याला ज्ञान आणि बौद्धिक कौशल्य फार मोठ्या प्रमाणात दिले आहे.
निसर्ग आणि माणसाचे जीवन हे निसर्गाचाच एक कलाविष्कार आहे. आपल्या आसपास अनेक गोष्टी घडत असतात. पण अनेकदा त्या स्वप्नवत वाटतात. माणसाने अस्तित्वात नसणाऱ्या अनेक गोष्टीना जन्म दिला आहे. शरीरात किवा बाहेर कुठेही सापडत नसलेले मन माणसाने शोधले. रोज उगवणाऱ्या सूर्याला आणि चंद्राला त्याने रात्र दिवसात मोजायला सुरुवात केली. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीना माणसाने नाव दिले. प्रत्येकाचे नामकरण झाले. अशा अनेक बाबी आहेत ज्या माणसाने सुरु केल्या. जगात माणसाचा जन्म झाला त्यावेळी सगळी माणस सारखीच होती. कदाचित त्या वेळी आपण एक सारखे दिसत आहोत म्हणून आपण आपल्याला माणूस हे नाव शोधून काढले आणि आपणच या नावाचे आपल्यासाठी बारसे केले असावे. मग पुन्हा एक महत्वाची गोष्ट माणसाच्या लक्षात आली असावी माणसातही फरक आहे. एक स्त्री आणि दुसरा पुरुष. स्त्री असणारी शरीराने कमकुवत तर काही शारीरिक भेद दोघांमध्ये दिसू लागले .मग शरीराने कमकुवत असणाऱ्या स्त्री वर पण निसर्गाचे तंत्र त्यांच्या लक्षात आले असावे आपल्या सारखीच माणस निर्माण करण्यासाठी निसर्गाची हि निर्मिती आहे. माणसाचा माणसाशी खरा भेद सुरु इथे सुरु झाला आहे असे मला ठामपणे वाटते. मग आजपर्यंत जे भेदामुळे मनुष्याचे नुकसान झाले आहे ते अगणित आहे.
जात, धर्म, स्त्री,पुरुष, भाषा, रंग, प्रांत, गरीब, श्रीमंत,शहरी ग्रामीण, सुशिक्षित अडाणी, ज्ञानी,अज्ञानी, अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या भेदामुळे माणसाला माणसापासून तोडण्याचे काम केले आहे. निसर्गालाही या सगळ्याचे आश्चर्य वाटत असेल. निसर्गाने फक्त एक माणूस घडवला माणसाने सारा निसर्ग बिघडवला. त्याचे सारे नियम पायदळी घेऊन विश्वाचा रचिता मीच आहे म्हणू लागला. स्वतःची प्रतिमा पूजन करून आपल्याला देव म्हणू लागला. काही वर्षापूर्वी आणि आजही काही लोक निसर्गाची पूजा करतात. यात सूर्य, चंद्र, अग्नी, वारा, जमीन यांचा समावेश होतो. हुशार माणसाने काही पुस्तके लिहिली त्याला नंतर धार्मिक ग्रंथ नाव पडले असावे. त्यात माणसाने कसे वागावे धर्माचे पालन न केले तर काय होते. आणि अशा काल्पनिक मनातून कल्पनेचे अनेक धर्म जाती उभ्या राहिल्या यातून भेद निर्माण झाले. ज्यातून रक्त सांडले. संपूर्ण माणूस आणि निसर्गाचे अतोनात नुकसान झाले ते कशानेही भरून निघणारे नाही.
मग माणसाने तयार केलेले हे मानव निर्मित जाती धर्म आणि इतर भेद संपवता नाही का येणार? माणसातील माणूसपण जागे करून त्याला निसर्गाशी एकरूप नाही का करता येणार? प्रेम आणि फक्त प्रेम देत जीवन नाही जगता येणार ? प्रत्येकाला इथे भीती आहे. हि भीती निसर्गातील प्राण्यांची, विध्वंसाची नाही तर माणूसपणाची आहे. माणूस माणसाला संपवतो आहे. हे थांबवण्यासाठी आपल्या सर्वाना माणूस म्हणून जगात असताना निसर्गाला जोपासत जगावे लागेल. अन्यथा माणूस हा या विश्वात खूप हुशार आणि सुंदर प्राणी होता असे एक दिवस म्हणण्याची वेळ निसर्गाला येईल.
खूप खूप छान लेख आहे सर.
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवा