साऱ्या जगाला तूच घडविले
भेद माणसाने निर्माण केले
जाती धर्मात वाटून टाकले
माणूसपण सारे वाया घालवले !!१!!
एकच वारा सूर्य प्रकाश
मोकळे बघ अथांग आकाश
दुभंगून सारी निसर्गाची नाती
वाटून टाकली काळी माती !!२!!
कशाला भेद करतो माणसा
तूच चालव निसर्गाचा वसा
नको जाती, धर्म, रंग व रूप
मायेची नाती माणुसकी जप !!३!!
किती करशील माणसाचा द्वेष
किती घेशील निसर्गाचा रोष
सावध होऊन माणुसकी वाढवू
निसर्ग नियमांचे पालन करू !!४!!
--- बिपीन जगताप
I LIKED YOUR THOUGHTS. I WISH YOU ALL THE BEST.
उत्तर द्याहटवा