बालपणीचा काळ सुखाचा
सहज जीवन जगण्याचा
हसत खेळत उड्या मारत
आनंद साजरा करण्याचा !!
बालपण म्हणजे खरे जीवन
बालपण म्हणजे मातीचे सेवन
बालपण म्हणजे निरागस हसू
बालपण म्हणजे खोटे आसू !!
मोठ्यांचे खळखळून हसणे
बाळासाठी मोठ्यांनी लहान होणे
शब्दांचे उच्चार तोतरे करणे !!
लहान बाळ खरंच गोड असते
सर्वाना ते हवे हवेशे वाटते
मोठ्यांचे जगणे लहान करते
आयुष्याला बालपणात घेऊन येते !!
बालपणीचा काळ सुखाचा
सहज जीवन जगण्याचा !!
-- बिपीन जगताप
kharach balpanacha kal sukhacha
उत्तर द्याहटवा