माझा नाही कोणताच पंथ
मला कोणीच भेटला नाही महंत
मी अडाणी आहे हीच मोठी खंत !
मला अध्यात्म नाही कळत
माझे मन देवाकडे नाही वळत
मला खूप गंभीर होता येत नाही
मला खूप ताणही घेता येत नाही !
मी सारे जग बदलू शकत नाही
मी जगाला साधा विचार देत नाही
मला माझ्या गावातही पुरेसे ओळखत नाहीत
जगाने ओळखावे अशी स्वप्नातही इच्छा होत नाही !
माझी कधी मोह माया सुटली नाही
अजूनही मातीची नाळ तुटली नाही
लोकांच्या दुखः त मी दुखः मानतो
लोकांच्या सुखात मी मनसोक्त नाचतो !
मी माझ्यापुरता फक्त बदलीन म्हणतोय
उद्या सुरुवात करीन असं मनाला सांगतोय
पण रोजचा दिवस मला नवा नसतोय
माझ्याच मनाला मी दररोज हसतोय !
--- बिपीन जगताप
khupach chhan !!!
उत्तर द्याहटवाSundar... Agadi sadhya shabdat khupach chhan kavita.... Mazya Facebook wall var tumachya navane share karato sir....
उत्तर द्याहटवामाझी कधी मोहक़ माया सुटली नाही
उत्तर द्याहटवाअजूनही मातीची नाळ तुटली नाही
लोकांच्या दुखात मी दुख मानतो
लोकांच्या सुखात मी मनसोक्त नाचतो
माणुसकीच्या नात्या मधील महत्वाच्या वरील चार ओळी
जगण्याचे सर्वात मोठे तत्वज्ञान आपल्या या चार ओळी सागतात .सामान्या माणूस यापेक्षा मोठे काहीच मागत नाही ,सांगत नाही ...सामन्याचे असामान्या पण सांगणारी ही कविता मला खूप भावली
aapala mi khup abhari aahe.
उत्तर द्याहटवाKHUPACH CHAN
उत्तर द्याहटवाthank you
हटवा